आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका बुथवर 30 कार्यकर्त्यांची नियुक्ती:राज्यात भाजपचे अभियान, नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

नागपूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप राज्यात बूथ सक्षमीकरण अभियान राबवणार आहे. एका बुथवर ३० कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येईल. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘घर घर तिरंगा, हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत भाजप कार्यकर्ते घरोघरी राष्ट्रध्वज उपलब्ध करून देणार असल्याची माहिती माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

महिनाभरात कार्यकारिणी

बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यात ९७ हजार ४४३ बूथ आहे. प्रत्येक बूथवर ३० प्रमुख कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. आता राज्यभरातील जिल्ह्यातील हजार पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी महिनाभरात जाहीर होईल. त्यानंतर तालुकास्तरावर कार्यकारिणी जाहीर केली जाईल.

लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज

बावनकुळे म्हणाले, ही निवडणुकीची तयारी नाही तर प्रक्रिया आहे. आम्ही तयारी करीत नाही, तर नेहमी तयारच असतो. अगदी आजही निवडणूक झाली तरीही आम्ही तयार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चारशेवर लोकसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने तसेच राज्यातही केव्हाही निवडणूक झाल्यास भाजप सज्ज असल्याचे आमदार बावनकुळे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...