आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान माेदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य:काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांच्याविरुद्ध भाजपची पोलिसांत तक्रार

नागपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र माेदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके व प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने, (ईडी ) हंगामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवार १३ जून रोजी नागपुरातील ईडी कार्यालयासमाेर विदर्भातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनीधरणे देऊन केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. या कार्यक्रमात बोलताना शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले.

हुसेन यांना कोणी थांबवले नाही

विशेष म्हणजे शेख हुसेन बोलत असताना व्यासपीठावर उर्जा मंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, आमदार अॅड. अभिजित वंजारी आदी नेते उपस्थित होते. मात्र, एकानेही हुसेन यांना बोलण्यापासून रोखले नाही. शेख हुसेन यांचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. हुसेन यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे वातावरण गढूळ झाले आहे. यास्तव त्यांच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके यांनी केली आहे.

रस्त्यावर उतरण्याचा इशारा

शेख हुसेन यांनी मोदींबद्दल अत्यंत निंदाजनक आणि खालच्या स्तराचे वक्तव्य केल्याचे बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मंगळवारी सायंकाळपर्यंत हुसेन यांच्याबद्दल गुन्हा दाखल केला नाही तर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करू वा प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...