आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय चिमूरचे आमदार कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर आपत्तीजनक पोस्ट शेअर करणाऱ्या साईनाथ बुटके यांना घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आता आमदार बंटी भांगडिया आणि साईनाथ बुटके यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल झाले, मात्र कोणालाही अटक नाही. चंद्रपूरचे चिमूरचे आमदार भांगडिया यांच्या विरोधात अश्लील शब्दातंर्गत मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा मजकूर साईनाथ ऊर्फ अश्वमेघ तुकाराम बुटके यांनी व्हायरल केला होता. या मजकुरावर आमदार भांगडिया चांगलेच भडकले होते. रागाच्या भरात आमदार बंटी भांगडिया हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन साईनाथ बुटके यांच्या चिमूर येथील राहत्या घरी गेले व त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. शेकडोच्या जमावासमोर हा प्रकार घडला होता. भांगडिया यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांवर भादंवि कलम १४३, १४७, १४९, ४५२, ३२३, ३५४, २९४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ बुटके यांचा कुठल्याही पक्षासोबत संबंध नाही. मात्र त्यांचे भाऊ गजानन बुटके हे काँग्रेसचे पदाधिकारी असून माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.