आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा विळखा:वर्धेतील भाजपचे आमदार डॉ. पंकज भोयर यांना कोरोनाची बाधा, स्वतः सोशल मीडियावर दिली माहिती

वर्धाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने सर्वांना बाधा होत आहेत.अशातच वर्धेतील भाजपचे आमदार डॉ पंकज भोयर कोरोना बाधीत असल्याची माहिती स्वतः त्यांनी प्रसार माध्यमांना देत सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत.

महाराष्ट्रातील सर्वत्र जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.जिल्ह्यात दररोज 40 ते 50रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असूनही कुठल्याही प्रकारची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.

वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ पंकज भोयर यांना कोरोना आजाराची लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांनी स्वतः सावंगी रुग्णालयात जाऊन चाचणी करुन घेण्यासाठी दाखल झाले होते. दिनांक २१ ऑगस्ट रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली असून,सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत.

या कोरोनाच्या आजाराची लागण सामान्य ते राजकीय व्यक्तींना होतांना दिसत आहेत,मात्र गोर-गरीब, रस्त्यांवर फिरणाऱ्या तसेच फुटपाथवर बसणाऱ्या व्यक्तींना या आजाराची लक्षणे दिसून येत नसल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना हा आजार प्रसिद्धी मिळावी याकरीता आहेत, की का अशी शंका उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...