आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असताना काँग्रेसी नेत्यांनी कमावलेल्या काळ्या पैशातून ‘भारत जोडो यात्रे’चा खर्च करण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना केली. यात्रेपासून काँग्रेसचा मूळ कार्यकर्ता दूर असून दिवसागणिक मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांची यात्रा ही नेत्यांची मुले काँग्रेसमध्ये नेते व्हावे, यासाठी काढली आहे. नेत्यांचे पुत्र युवक काँग्रेसच्या माध्यमातून भारत जोडो यात्रेसाठी भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा खर्च करत आहेत. ही यात्रा काँग्रेसच्या मूळ कार्यकर्त्यांच्या कोणत्याही कामाची नाही. २०२४ पर्यंत महाविकास आघाडीत अनेक मोठे बॉम्बस्फोट होतील. यावर अनेकांना आश्चर्य होईल. येत्या दीड वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नाराज कार्यकर्ते भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करतील, असेही भाकित त्यांनी वर्तवले. मागील अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीचा अजेंडा राबवला.
अंधारेंनी स्वत:ची बौद्धिक उंची तपासावी : सुषमा अंधारे सुपारी घेतल्यासारख्या बोलतात. त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत कुठेही बरोबरी होऊ शकते का, असा सवाल बावनकुळेंनी केला. सुषमा अंधारेंना एवढेच सांगणे आहे की, त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी जपून बोलावे. ज्यांच्याबद्दल त्या बोलतात, त्या नेत्याची आणि स्वतःची बौद्धिक उंची त्यांनी तपासून घ्यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.