आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकांची आज मतमोजणी होत आहे. निवडणूक आयोगाकडून या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या आहेत तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यात आली आहे. दरम्यान अकोला आणि नागपुरात भाजपने बाजी मारली आहे. नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा या दोन्ही जागांवर भाजप उमेदवार हे विजयी झाले आहेत. दोन्ही उमेदवारांच्या विजयाची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.
विधान परिषदेच्या या दोन्ही जागांवर 10 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज या निवडणुकांची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये दोन्हीही जागांवर भाजपने बाजी मारली आहे. नागपूरच्या जागेवर भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. तर आघाडीने भाजपचे माजी नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट दिले होते. मात्र भाजपचा नगरसेवक फोडूनही काँग्रेसला यश मिळू शकलेले नाही. येथे चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते तर कॉंग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते तर कॉंग्रेसचे अधिकृत छोटू भोयर यांना 1 मत मिळाले आहे.
अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल हे दोघे निवडणुकींच्या रिंगणात उतरलेले होते. यामध्ये भाजपचे वंसत खंडेलवाल यांनी शिवसेनेला पराभवाची धूळ चारली झाले. शिवसेना गोपिकीशन बाजोरिया यांना 334 तर भाजप वसंत खंडेलवाल 443 मते पडली आहेत. गेल्या तीन टर्मपासून आमदार असलेल्या गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
अकोल्यात शिवसेनेला धक्का
यापूर्वी सलग तीन वेळा शिवसेनेचे आमदार गोपिकीशन बाजोरिया निवडून आले होते.या पूर्वी सन 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यातील एकूण 790 मतदार होते. त्यात अकोला येथील शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बजोरिया यांनी विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साजरी केली होती. भाजपची शिवसेनेसोबत युती होती. मात्र यावेळी झालेल्या निवडणुकीत महा विकास आघाडीचे शिवसेना व भाजपचे मध्ये सामना रंगला होता. एकूण 822 पैकी 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया पार पडली अखेर भाजपचीच वसंत खंडेलवाल यांना विजयी घोषित करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.