आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:ठाकरे सरकारविरोधात भाजपचे आंदोलन; सत्ताधारी मंत्री मात्र गडकरींच्या अंगणात

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाविकास आघाडी मंत्र्यांच्या साथीने गडकरींचा शेतकऱ्यांशी संवाद

कोरोनाचे संकट हाताळण्यात उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या सरकारला अपयश आल्याचा ठपका ठेवत भाजपने आपल्या अंगणाचे रणांगण करून सरकारवर तोफ डागली, तर दुसरीकडे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्यासाठी सत्ताधारी आघाडीचे मंत्री, नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अंगणात रविवारी एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कोरोना संकट हाताळण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याचा ठपका ठेवून भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात ‘माझं अंगण, माझं रणांगण’ आणि ‘महाराष्ट्र बचाव’ हे आंदोलनही केले होते.

मंत्री सुनील केदार,विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

सोशल मीडियाच्या माध्यमातून गडकरी यांनी आपल्या निवासस्थानाहून विदर्भातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांच्यासमवेत महाविकास आघाडी सरकारचे मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार, शिवसेना खासदार कृपाल तुमाने, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या वेळी मंत्र्यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...