आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याकरीता भाजपाचे आंदोलन; पैसे कमी पडतील म्हणून मागितली भीक - भाजप

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपाने नागपुरातील संविधान चौकात आंदोलन केले

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे चर्चेत आलेले वादग्रस्त गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपाने नागपुरातील संविधान चौकात आंदोलन केले. भाजपाचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सर्वच आमदार, लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते. परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटींची वसूली करायला सांगितल्याचे नमुद केले आहे.

यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी मागणी भाजपाने केली आहे. केन्द्रीय यंत्रणेमार्फत अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या लेखी आरोपाची चौकशी करावी अशी मागणी भाजपाच्या आमदारांनी केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. गृहमंत्र्यांना पैशाची कमतरता असल्याने त्यांनी १०० कोटी मागितले. त्यांना पैसे देण्यासाठी म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी पैसे गोळा केले.

बातम्या आणखी आहेत...