आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प. अध्यक्षपद निवडणूक:भंडारा जिल्हा परिषदेची उद्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक, राष्ट्रवादी कुणाशी करणार घरोबा?

भंडारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक उद्या 10 मे रोजी होणार आहे. भाजपचे निरीक्षक म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसशी युती न करता भाजपसोबत हातमिळवणी करत पंचायत समीत्यांवर सत्ता काबीज केली आहे. यामुळे भंडारा जिल्हापरिषदेवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष बसणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपमध्ये आजी - माजी आमदार समोरासमोर
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस यांच्यात वाद पेटला आहे. यामुळे भाजपला सुवर्ण संधी असली तरी सुद्धा भाजपमध्ये आमदार डॉ. परिणय फुके आणि माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटात अध्यक्षपदासाठी चढाओठ सुरू झाली आहे. भाजपमधील अंतर्गत वाद पाहता अध्यक्षपद आपल्या हातून जाऊ नये यासाठी भाजपकडून आमदार चंद्रशेखर बावन कुळेंची निवडणूक निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

मविआचे समीकरणे केवळ राज्य पातळीवर
भंडाऱ्यातील 7 पैकी 4 पंचायत समीत्यांवर राष्ट्रवादीचा उमेदवार सभापती म्हणून निवडून आला आहे. मात्र ईथे राज्यातील महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम धुडकावत राष्ट्रवादीने भाजपला जवळ करत स्तत्ता स्थपन केली आहे. तर उरलेल्या 3 पंचायत समीत्या पैकी दोन काँग्रेसच्या तर 1 भाजपच्या ताब्यात गेली आहे. यात भंडारा पंचायत समितीच्या सभापतीपदी रत्नमाला चेटुले यांची निवड करण्यात आली आहे. तर लाखांदूरला संजना वरखडे, पवनीत नूतन कुरझेकर, तर मोहाडीत रितेश वासनिक यांच्या गळात सभापती पदाची माळ पडली.

तुमसर भाजपचे नंदू रहांगडाले तर साकोलीत काँग्रेस गणेश आले व लाखनीत प्रणाली सारवे पंचायत समितीपदी निवडून आले आहेत. या निवडणुकानंतर आता जि.प. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी - भाजप युती होणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...