आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:भाजपची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

भंडारा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ता हातातून गेल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. विरोधी पक्ष जनतेचे प्रश्न कमी आणि स्वतःचे प्रश्न जास्त उपस्थित करून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहे. भाजपचे हे वागणे लोकशाहीसाठी घातक आहे. पाण्याबाहेर काढलेला मासा जसा तडफडतो जणू तशीच अवस्था सत्तेपासून दूर गेलेल्या भाजपची झाली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

पटोले म्हणाले, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या घराजवळून तब्बल एक किलोमीटर दूर अंतरावर होती. मात्र, भाजपचे नेते ती गाडी अंबानींच्या घराजवळ असल्याचे सांगत आहेत. या गाडीत स्फोटके नव्हती तर त्या जिलेटिन कांड्या असल्याचे स्पष्ट झाले. याचा संबंध थेट नागपूरशी असल्याचेही चौकशीत समोर आले. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंतोतंत स्क्रिप्ट वाचली. यावरूनच याची पूर्वसूचना त्यांना असल्याचे स्पष्ट होते. मात्र, येनकेन प्रकारे मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र भाजपकडून होत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांचे सलोख्याचे संबंध होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींची चौकशी समिती गठीत केली आहे. या चौकशीत लवकरच सर्व सत्य जनतेसमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...