आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोलीत दुर्घटना:इंद्रवती नदीत बुडाली बोट, 13 जणांना वाचवण्यात यश; काही जण बुडाल्याची शक्यता

गडचिरोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही लोक दोन लहान नाव घेऊन छत्तीगडमधील कार्यक्रमाला जात असताना ही दुर्घटना घडली

गडचिरोली जिल्ह्यातील इंद्रावती नदीमध्ये नाव बुडाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या बोटीत 15 जण होते. त्यातील 13 जणांना वाचवण्यात यश आले तर दोन महिला अद्याप बेपत्ता आहे. मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नेमकी बोट कशामुळे बुडाली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यात सोमनपल्ली भागातून छत्तीसगड इथे एका कार्यक्रमासाठी दोन नाव घेऊन काही जण निघाले होते. या दोन्ही नाव कार्यक्रम आटोपून परतत असताना मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. 13 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे तर आणखीन दोन महिला बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. वन विभाग, ग्रामस्थ आणि पोलिसांकडून बेपत्ता असणाऱ्यांचा शोध सुरू आहे. काल सायंकाळी अंधार असल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली होती. आज परत शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...