आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान ऑस्ट्रेलिया संघ!:बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कसाेटी मालिका गुरुवारपासून

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या गुरुवारपासून यजमान टीम इंडिया आणि पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघांतील प्रतिष्ठेच्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कसाेटी मालिकेला सुरुवात हाेत आहे. या चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेची सलामीची लढत नागपूरच्या व्हीसीए मैदानावर रंगणार आहे. त्यामुळे ९ फेब्रुवारीपासून हे दाेन्ही संघ नागपूरच्या मैदानावर सलामीच्या कसाेटीदरम्यान समाेरासमाेर असतील. यजमान भारतीय संघ सध्या नागपूरच्याच मैदानावर या कसाेटी मालिकेसाठी कसून सराव करत आहे.

तसेच पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ बंगळुरूच्या अल्लूर येथे सराव करताना दिसत आहे. सध्या ऑस्ट्रेलिया संघाने २००४ पासून आजपर्यंत कायम असलेली पराभवाची मालिका ब्रेक करण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतातील फर्स्ट क्लास फिरकीविरुद्ध टर्निंग पिचवर घाम गाळत आहेत. कारण, त्यांचा घरच्या मैदानावर यजमान भारताच्या कसाेटीमधील वर्चस्वाला धक्का देण्याचा मानस आहे. मात्र, हे पाहुण्या संघांसाठी आतापर्यंत अशक्य ठरले आहे. यात ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे.

२०१३ पासून घरच्या मैदानावर अजय; विक्रमी कामगिरीची नाेंद : भारतीय संघाने घरच्या मैदानावरील कसाेटी मालिकांत विजयी माेहीम कायम ठेवत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. यातून भारतीय संघ २०१३ पासून घरच्या मैदानावर कसाेटी सामन्यांदरम्यान अजेय राहिला आहे. यादरम्यान भारताने १५ कसाेटी मालिका जिंकल्या आहेत. यातून टीमच्या नावे विक्रमाची नाेंद केली आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलिया आणि विंडीज संघाला घरच्या मैदानावर प्रत्येकी दाेन वेळा कसाेटी मालिका जिंकता आल्या आहेत.

गत १० वर्षांत ४२ पैकी २४ कसाेटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे २००+ धावांच्या अंतराने दणदणीत विजय भारतीय संघाला पारंपरिक कसाेटी फाॅरमॅटमध्ये चांगलाच जम बसवता आला आहे. यातून भारताने गत दहा वर्षांमध्ये एकूण ४२ कसाेटी सामने खेळताना लक्षवेधी विजय साजरे केले. भारताने यामधील २४ कसाेटी सामने २०० पेक्षा अधिक धावांच्या अंतराने जिंकले आहेत. भारताने ४२ पैकी ३४ कसाेटींत विजय संपादन केले. यातील २४ कसाेटीतील विजय हे माेठ्या फरकाने नाेंदवले गेले आहेत. म्हणजेच भारताची यादरम्यान कसाेटीमध्ये ८०.९५ अशी विजयाची टक्केवारी नाेंद आहे. अशी कामगिरी ऑस्ट्रेलिया संघाला १९९८ ते २००७ दरम्यान करता आली हाेती. यादरम्यान संघाने ५९ पैकी ४७ कसाेटी सामने घरच्या मैदानावर जिंकले हाेते. यातून संघाला घरच्या मैदानावर ७९.६६ टक्के विजय संपादन करता आले. मात्र, आता ऑस्ट्रेलिया संघाच्या या फाॅरमॅटमधील कामगिरीत कमालीची घसरण झाली आहे. याचाच फायदा घेत भारताने यामध्ये माेठी प्रगती साधलेली आहे.

यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स करताेय रिव्हर्स स्विंगवर सराव यजमान भारताविरुद्ध या बीजीटी मालिकेचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी माेठा धसका घेतला आहे. त्यामुळेच या मालिकेदरम्यान विजय साजरा करण्यासाठी फलंदाज व गाेलंदाज राेज वेगवेगळे प्रयाेग करत आहेत. आता संघाचे फलंदाज स्पिनपाठाेपाठच रिव्हर्स स्विंगवरही कसून सराव करत आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स केरीने बंगळुरूमध्ये यासाठी कसून सराव केला. ‘मी २०१८ मध्ये भारतात कसाेटी सामना खेळला हाेता. यादरम्यान मला खेळताना वेगवान गाेलंदाजांच्या रिव्हर्स स्विंग चेंडूंचा सामना करताना अनेक अडचणी आल्या. यामुळेच मी सपशेल अपयशी ठरलाे हाेताे. आता असे पुन्हा घडू नये, म्हणूनच मी माेठी खबरदारी घेत आहे,’ असे अॅलेक्स म्हणाला. यातून त्याचे सहकारीही यासाठीची कसून तयारी करत आहेत. त्यामुळे दाैऱ्यावर त्यांना आपल्या कामगिरीचा दर्जा सुधारण्याची माेठी संधी आहे.

काेच द्रविडने केली क्युरेटरशी चांगल्या पिचसाठी खास चर्चा विदेशी संघ हे भारत दाैऱ्यावर फिरकीचा सामना करण्यात सपशेल अपयशी ठरतात, हेच आजवर कायम राहिले आहे. मात्र, तरीही भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने नागपूरच्या व्हीसीए मैदानावरील क्युरेटरसाेबत खास चर्चा केली. यादरम्यान चांगली पिच तयार करण्याचेही त्यांना सांगितले आहे. कारण, लखनऊ येथील पिच वादग्रस्त ठरली हाेती. त्यामुळे अशा प्रकारचा वाद हाेऊ नये, याची खबरदारी घेण्याचेही सांगितले.

बातम्या आणखी आहेत...