आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतासह १९ देश आणि युरोपीय महासंघाचा समावेश असलेल्या "जी-२०' गटाची परिषद मार्च-२३ मध्ये नागपुरात होत आहे. २०० हून अधिक प्रतिनिधी यात सहभागी होत असून या परिषदेच्या निमित्ताने संत्रा नगरी म्हणून ओळख असलेल्या नागपूरचे ब्रँडिंग मात्र "टायगर कॅपिटल ऑफ इंडिया' म्हणून केले जाणार आहे. हे नियोजन पर्यटन विकास महामंडळाला सोपवण्यात आले आहे. देशात मध्यवर्ती भागातील विदर्भाला लागून असलेल्या मध्य प्रदेशसह इतर राज्यांतील वनक्षेत्रांत वाघांचा वाढता वावर पाहता हे ब्रँडिंग केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. संत्र्याबाबत यात काहीच उल्लेख नाही. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राकडे सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी सोपवली आहे.
विदर्भामध्ये २०० वाघांचा संचार २०२२ च्या व्याघ्रगणनेनुसार राज्यात ३१२ वाघ. यातील एकट्या विदर्भात २००. 65 टक्के वाघ विदर्भात राज्यातील एकूण वाघांपैकी. या ३१२ वाघांपैकी सुमारे २०० एकट्या विदर्भात आढळले. पेंच, मेळघाट, ताडोबा, नवेगाव, नाझिरा आणि बोर व्याघ्र प्रकल्पांमध्ये हे वाघ आढळून आले आहेत.
देशाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून... देशात ५२६ वाघ असलेले मध्य प्रदेश, कर्नाटक (५२४), उत्तराखंडपाठोपाठ (४४२) महाराष्ट्रात ३१२ वाघ असल्याची जुलै २०२२ मधील नोंद आहे. या क्रमात महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानी असला तरी देशातील मध्यवर्ती वनक्षेत्र व सहा व्याघ्र प्रकल्प असलेल्या विदर्भाचा विचार करून नागपूरचे ब्रँडिंग टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असे केले जाणार आहे. जी-२०च्या कार्यक्रम पत्रितकेतही हा उल्लेख आहे.
... अन् संत्रा पडला मागे! नागपुरी संत्रा म्हणून देशभर ख्यात असलेला हा संत्रा अलिकडे मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. अमरावती जिल्ह्यात ग्रेडिंग, कोटिंग व पॅकेजिंग करणारे सुमारे १२ प्रकल्प सुरू झाल्याने विदर्भातील संत्रा उत्पादकांना चांगला फायदा झाला आहे. रस्ता मार्गे बांगला देशला रोज ८०० ते १००० हजार टन संत्रा निर्यात होत असल्याची माहिती महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी दिली. असे असूनही जी-२० पत्रिकेत संत्राचा उल्लेख नाही.
संत्र्याचे क्षेत्र १.५५ लाख हेक्टर नागपूरसह विदर्भात १ लाख ५५ हजार हेक्टरवर संत्रा लागवड केली जाते. या भागातून संत्रा निर्यातीला प्रोत्साहनासाठी राज्य सरकारच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अमरावतीत ग्रेडिंग, कोटिंग व पॅकेजिंग करणारे सुमारे १२ प्रकल्प उभारल्याने याचा फायदा होत आहे. दुबईसह आखातातूनही आता संत्राच्या ३० कंटेनरची मागणी हाेत आहे.
जी-२०साठी नागपुरात जय्यत तयारी “जी-२०’ परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींसाठी विमानतळावर खास व्हिआयपी लाॅऊंज उभारण्यात येणार आहे. या पाहुण्यांना मेट्रो राईडसह दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, फुटाळा तलाव, पेंच व्याघ्र प्रकल्प आदी ठिकाणी भेटी आयोजित करण्यात येणार आहे. पाहुण्यांना फिरण्यासाठी खास इलेक्ट्रिक कार्स आणण्यात येतील. सर्व पाहुण्यांना एकसारख्या भेट वस्तू देण्यात येणार असून त्या मुंबईहून येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
जी-२० परिषदेनिमित्त पश्चिम नागपुरातील रस्ते खड्डेमुक्त आणि चकाचक होणार आहेत. या शिवाय सिव्हिल लाइन, जामठा स्टेडियम, दीक्षाभूमी, बर्डी आदींचे सौंदर्यीकरण करण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.