आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:आमगाव देवळी नाल्यात भाऊ बहिण वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू; प्रारंभी घातपाताचा संशय

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांच्या आईने रात्री हिंगणा पोलिस ठाण्यात दाखल केली होती

हिंगणा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सावंगी देवळी येथील नाल्यात सख्खे बहीण भाऊ वाहून गेल्याची घटना घडली आहे. परंतु, दोघांचेही कपडे आणि चप्पल नाल्याच्या काठावर आढळून आल्याने प्रारंभी घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, सोमवारी सकाळी दोघांचेही मृतदेह शोधण्यात यश आले. आरूषी नामदेव राऊत (वय 11) व अभिषेक नामदेव राऊत (वय 8) ही बहीण भावंडांची नावे आहेत. दरम्यान, कोंबडी पकडता पकडता ते दोघेही गावाशेजाराच्या नाल्यापर्यत गेले. नाल्यात मोसाळ्या दिसताच दोघांनी मासे पकडायला सुरुवात केली. परंतु, नाल्यात पाणी खोल असल्याने एकेक करत बुडायला लागले असल्याची शक्यता स्थानिक गावकऱ्यांत वर्तवली जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे दोघेही बहीण भाऊ रविवार दुपारपासून बेपत्ता असल्याची तक्रार मुलांच्या आईने रात्री हिंगणा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. राज पांडे या पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुले बेपत्ता असल्याची तक्रार आल्याने प्रारंभी घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, हिंगणा पोलिसांनी रात्रभर शोध घेतल्या नंतरही मुले आढळून आली नाही. सोमवारी सकाळी पोलिस सावंगी देवळी येथे पोहोचले. तिथे दोघांचेही मृतदेह काढण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...