आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आमदार आपल्या गावी मुक्कामी' उपक्रम:चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया जातात गावोगावी मुक्कामी; जाणून घेतात समस्या

चंद्रपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर मतदारसंघाचे भाजप आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांनी आमदार आपल्या गावी मुक्कामाला असा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. मतदारांसोबत जनसंपर्क वाढावण्यासह त्यांनी मतदारसंघातील प्रश्न जाणूण घेत सोडविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती आहे.

एकदा निवडणूक झाली की लोकप्रतिनिधी मतदारसंघात दिसणे तसे फार दुर्मिळ असते. काही काम असेल तर तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात मतदारांना चकरा माराव्या लागतात. मात्र, 1 एप्रिलपासून बंटी भांगडिया हे मतदारसंघातील कोणत्याही गावात आपली बॅग घेत दाखल होत आहे. सध्याकाळी गावातील लोकांशी चौकात बसून चर्चा करतात आणि त्यानंतर गावातील लोकांसोबतच जेवताना दिसून येत आहे. गेली 11 दिवस त्यांचा हाच नित्यक्रम पाहायला मिळतो आहे.

विशेष म्हणजे गावकऱ्यांना मोठमोठ्या प्रकल्पांच्या आणि विकासकामांच्या अपेक्षा नसून सरकारी कार्यालयात त्यांची छोटी-छोटी कामं होत नाही याचाच जास्त त्रास होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. यातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी होत असली तरी सुद्धा यामुळे आमदारांना गावातील बारीक सारीक सर्वच समस्या कळत आहेत.

बंटी भांगडिया यांच्या चिमुर मतदारसंघाचे जवळपास पावणे चारशे गावे आहेत. यातील पहिल्या टप्पात 50 गावांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमातून लोकांची कामे अवघ्या काही मिनिटात होत असल्याने समाधान मिळत असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

चिमुर मतदारसंघ नेमका कसा?

चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघावर सर्वाधिक प्रमाणात काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. ​​​​2019 च्या निवडणुकीत बंटी भांगडिया यांना ​​​87 हजार 146 मते मिळाली तर 2014 च्या निवडणुकीत त्यांना 87 हजार 377​ मते मिळाली होती. यापूर्वी विजय वडेट्टीवर शिवसेनेत असताना 2004 साली युतीला या मतदारसंघात सत्ता मिळाली होती. 1995, 2004 आणि 2014, 2019 वगळता सर्व निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसच्या हाती सत्ता आलेली आहे.