आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:गोदामातील कागदाची बंडले विकून नोकराने मालकाला लावला साडेसात लाखांचा चुना

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोदामातील कागदाची बंडले विकून नोकराने मालकाला साडेसात लाखांचा चुना लावल्याची घटना गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी पीयूष विनोद फत्तेपुरिया (वय ४४) यांचे रामदासपेठेत जैन पेपर्स या नावाने गोडावून आहे. आरोपी विष्णू राजकुमार सबरसाठी (वय २३) हा त्यांच्या दुकानात नोकर होता. नोकर विष्णूने १० ते २८ ऑक्टोबर दरम्यान गोडावूनमधील ७ लाख ६८ हजार रुपयांचे १५० बंडल सुनील अग्रवाल याला विकले. हे लक्षात येताच मंगळवारी रात्री गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...