आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोबाड गांधी यांच्या ' फ्रॅक्चड फ्रिडम ' ला पुरस्कार नाकारल्याचा संताप लेखक तसेच परीक्षकांकडून सातत्याने व्यक्त होत आहे. नीरजा, डाॅ. प्रज्ञा पवार, शरद बावीस्कर, आनंद करंदीकर आदींनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिल्या नंतर आता लोकवाङ्मगृह प्रकाशन आणि प्रगतिशील लेखक संघाने संयुक्तरीत्या निषेध करीत मोहीम सुरू केली आहे.
शासनाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या, कोबाड गांधी यांच्या 'फॅक्चर फ्रीडम' या अनघा लेलेद्वारा अनुवादित पुस्तकास शासकीय पुरस्कार जाहीर झाला. मात्र स्वतंत्रपणे जी. आर. काढून सदर पुरस्कार वापस घेण्यात आला. शासनाच्या या निर्णयाचा लेखक, कवी, सामाजिक सांस्कृतिक जीवनात कार्यरत असणारे कार्यकर्ते तीव्र निषेध करीत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
सार्वजनिकपणे जाहीर झालेला आणि परीक्षकांकडून शिफारस करण्यात आलेल्या कोणत्याही प्रकारचे वाचन, परीक्षण तथा शहानिशा न करता पुरस्कार वापस घेण्याची कृती लोकशाही मूल्याला काळीमा फासणारी आहे. अशा मनमानी फॅसिष्ठ प्रवृत्तींचा जाहीर निषेध करीत असल्याचे डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. भालचंद्र कानगो, उत्तम कांबळे, प्राध्यापक प्रसेनजीत तेलंग, राकेश वानखेडे, चंद्रकांत बाबर, जी. के. ऐनापुरे, डॉ. सुधाकर शेंडगे, माधान इंगळे, डॉ. मिलिंद कसबे, प्रसेनजीत गायकवाड, राजकुमार कदम, डॉ. इकबाल मिन्ने, कवी प्रमोद अहिरे, प्रल्हाद पवार, कॉम्रेड महादेव खुडे, डॉ. प्रवीण बनसोड, गिरीश फोंडे, प्रसाद कुलकर्णी, लक्ष्मीकांत देशमुख, प्रशांत गौतम, रजनीश राणे (स्वामीराज प्रकाशन), शशिकांत हिंगोणेकर आदींनी संयुक्तरित्या आवाहन केले आहे.
कोबाड गांधी हे नक्षलवादी चळवळीचे महत्त्वाचे नेते आहेत. कोबाड गांधी हे कानू सन्याल यांच्या नंतर नक्षलवादी गटांना वैचारिक खतपाणी देणारे व आपले आयुष्य नक्षलवाद्यांसाठी समर्पित केलेले नेते म्हणून ते ओळखले जातात. अशा नक्षलसमर्थक नेत्याच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्य शासनाचा अनुवादासाठीचा यशवंतराव चव्हाण वांङमय पुरस्कार मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून नव्या वादाला ताेंड फुटण्याची शक्यता आहे. 2020-21 वर्षाचे हे पुरस्कार आहे.
कोबाड गांधी माओवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही आहेत. देशात नक्षलवादी जाळे पसरविण्याच्या आरोपाखाली कोबाड गांधी यांना दिल्ली पोलिसांनी 2009 साली अटक केली होती. कोबाड गांधी हे कम्युनिस्ट विचाराचे आणि जातविरोधी कार्यकर्ते आहेत. त्यांनी दिल्ली, आंध्र प्रदेश आणि देशातील इतर अनेक तुरुंगांत माओवादाच्या आरोपाखाली एक दशक घालवले आहे.2009 मध्ये जेव्हा त्यांना प्रथम अटक करण्यात आली, तेव्हा त्यांच्यावर ‘ज्येष्ठ माओवादी नेता’ असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आता न्यायालयाने त्यांना या आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.