आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक, भीषण अपघातात पतीसह आई वडिलांचा मृत्यू; मुलीवर गुन्हा दाखल

वर्धा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उभ्या ट्रकला धडकली कार, तीन गंभीर जखमी

भरधाव वेगाने असलेल्या चारचाकी वाहनाने उभ्या ट्रकला भीषण धडक दिली. या अपघातात पतीसह आई -वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी व तिचे दोन मुले गंभीर जखमी झाले असल्याची घटना मलकापूर गावाजवळ पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाहन चालक मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर येथील असलेल्या हिंगणा रोड राय टाऊन येथे रहिवासी असलेले वडील दिलीप वामनराव इंगोले (वय ६८ वर्षे), आई सुरेखा दिलीप इंगोले (वय ५८ वर्षे) आणि वाहन चालकचा पती दीपक चैताराम मुंजेवार (वय ४३ वर्षे) पत्नी हेमंती दीपक मुंजेवार (वय ३९ वर्षे) मुलगा तेजस (वय १४ वर्षे) व मुलगी काजल (वय ८ वर्षे) सहा जण एम एच ४० बी ई ८३९४ या चारचाकी वाहनाने गोवा येथे फिरायला गेले होते. गावी जाण्यासाठी मुलीने वाहन चालवीत पुलगाव मार्गाने जात असताना तिचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला मलकापूर गावाजवळ उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला (क्रमांक एम एच २७ एक्स २४०१) पहाटेच्या सुमारास जबर धडक दिली. या अपघातात वाहनाचा चकनाचूर झाला असून आई -वडील व पतीचा जागीच मृत्यू झाला. तर मृतकाची मुलगी हेमंती मुंजेवार व दोन मुले गंभीर जखमी झाले असल्याने त्या तिघांना पुलगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात होते.

या भीषण अपघातात पतीसह आई- वडिलांचा घटनास्थळी मृत्यू झाला असल्याने, या अपघातात मुलीला आरोपीच्या कटघऱ्यात उभे करण्यात आले. तिच्यावर २७९,३०४ (अ) सहकलम १८४ मोटर वाहन कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...