आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:कोरोना बाधित तरुणीसह तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल, शहरात संसर्ग वाढवल्याची तक्रार

वर्धाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरात वाढविला संसर्ग वाढवल्याची अधिकाऱ्यांनी दिली तक्रार

मुंबई येथून कुठल्याही अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी न घेता जिल्ह्यात दाखल झाली असून, ती कोरोना बाधित आढळून आली असल्याने, तिचा पती शहरात कोरोनाचा संसर्ग पसरवितो असल्याबाबत आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारिवरुन सावंगी मेघे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना बाधित तरुणी विना परवानगीने शहरात दाखल झाली होती. तिने कुठल्याही प्रकारची आरोग्य तपासणी केली नव्हती. आरोग्य यंत्रणेला याबाबत सविस्तर माहिती दिली नसून, तिच्या पतीने शहरातील विविध भागात जाऊन कोरोनाचा संसर्ग पसरविला असल्याने, नोडल अधिकारी अनिल माळोदे यांनी कोरोना बाधित परिचारिकासह तिच्या पती विरोधात सावंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी भादंवी 1860 कलम 188, 269, 270 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना बाधित तरुणीचा अहवाल दिनांक 26 मे रोजी पॉझिटिव्ह आला. तिचा पती हा शहरातील बाजारपेठत वावरत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...