आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली:तेंदुपत्ता गोळा करण्यास गेलेल्या दोन मजुरांवर रानडुकरांचा हल्ला

गडचिरोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरची तालुक्यातील मसेली जंगल परिसरात तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिला व पुरुष अशा दोन मजुरांवर रानडुकराच्या कळपाने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजता घडली. स्मिता अशोक जांभूळकर (४५) रा. मसेली, तर केशव मेश्राम रा. सावली असे जखमी झालेल्या पुरुष मजुराचे नाव आहे.

कोरची तालुक्यात मागील पाच दिवसांपासून तेंदुपत्ता संकलन करण्यास सुरुवात झाली असून, महिला व पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात तेंदुपत्ता गाेळा करण्यासाठी जंगलात जातात. मसेली गावाजवळ असलेल्या डोंगरावर महिला व पुरुष मजूर तेंदुपत्ता संकलन करत असताना अचानक रानडुकराच्या कळपाने हल्ला केला. या हल्ल्यात दोन मजूर जखमी झाले. दरम्यान सहकाऱ्यांनी आरडाओरड केल्याने रानडुकरांनी पळ काढला. जखमी महिलेला कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर दुखापत असल्यामुळे तिला गोंदिया येथे हलवण्यात आले. या घटनेमुळे तेंदुपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या मजुरांमध्ये दहशत निर्माण झाली अाहे.

बातम्या आणखी आहेत...