आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • CBI Registers FIR Against Anil Former Home Minister Anil Deshmukh, Raid In Many Cities Including Mumbai And Nagpur; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

100 कोटी वसुलीचा आरोप:अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी पोलिस बंदोबस्तात वाढ; देशमुख सध्या नागपुरातच मुक्कामी

नागपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानासह राज्यातील 10 ठिकाणी छापे टाकले आहेत

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी पोलीसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अनिल देशमुख हे सध्या नागपुरातच मुक्कामी आहेत. माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह यांच्या आरोपांवर चौकशी करणार्‍या सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानासह राज्यातील 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. नागपुरातील निवासस्थानी सीबीआयचे पथक पोहोचले असून ते संबंधित प्रकरणाची चौकशी करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

देशमुख यांच्या निवासस्थानी असलेल्या एका कर्मचाऱ्यांने अनिल देशमुख हे नागपुरात मुक्कामी असल्याचे सांगितले आहे. आज सकाळीच अनिल देशमुख हे मॉर्निग वॉकला गेले होते असेही या कर्मचाऱ्यांने प्रसारमाध्यमांना सांगितले. देशमुख यांच्या निवासस्थानी बंदोबस्तावर असलेल्या सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्‍यांना विचारले असता त्यांनाही या बाबत सध्या माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र पीपीई कीट घालून काही जण देशमुख यांच्या निवासस्थानाच्या आत असल्याचे दिसत आहे.

तर देशमुख यांच्या घराच्या बाहेर दिल्लीची नंबरप्लेट असलेले चार चाकी वाहन उभे आहेत. मात्र जो पर्यत देशमुख यांच्या घरातून कोणीही घराबाहेर येत नाही तो पर्यंत वस्तूस्थिती कळणार नाही. सीबीआयचे मात्र सात ते आठ अधिकारी देशमुख यांच्या घरी असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...