आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पी:जिल्ह्यांच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक 3 दिवस दाैऱ्यावर

नागपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लम्पी स्किन आजारामुळे आतापर्यंत हजाराे पशूंचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. राज्यातील लम्पीप्रभावित जिल्ह्यांचा दौरा करण्यासाठी तीनसदस्यीय केंद्रीय पथकाचे सोमवारी सकाळी आगमन झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त देवेंद्र जाधव यांनी दिली.

लम्पीचा प्रादुर्भाव अमरावती आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तसेच सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, अकोला, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यांना भेटी देऊन पथक माहिती घेणार आहे. त्यानंतर केंद्राला अहवाल सादर करेल, असे जाधव यांनी सांगितले. २३ नोव्हेंबरला नागपूर येथून हे पथक दिल्लीला रवाना होणार आहे.

अहवालाची अजून प्रतीक्षाच जनावरांमध्ये लसीकरणापूर्वी आणि लसीकरणानंतर ७, १४, २१ आणि २८ या दिवसांनंतरच्या रक्तजलाचे (सिरम) नमुने घेऊन ते बंगळुरूच्या राष्ट्रीय रोग परिस्थिती विज्ञान आणि रोग माहिती संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. यातून रोगप्रतिकारशक्तीचे प्रमाण कळेल. मात्र हा अहवाल अजून प्राप्त झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...