आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पी प्रभावित जिल्ह्यांची होणार पाहणी:केंद्रीय पथकाचा आजपासून 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा; आतापर्यंत हजाराे पशूंचा मृत्यू

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात ‘लम्पी स्किन आजरा’मुळे आतापर्यंत हजाराे पशूंचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे.

राज्यातील लम्पी प्रभावित जिल्ह्यांचा दौरा करण्यासाठी केंद्रीय पथकाचे सोमवारी सकाळी आगमन झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त देवेंद्र जाधव यांनी दिली. राज्यात आतापर्यंत 17 कोटींची नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहितीही जाधव यांनी दिली.

या जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव सर्वाधिक

लम्पीचा प्रादुर्भाव अमरावती आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आहे. या तीन जिल्ह्यातील सोलापूर, करमाळा, कर्जत, औरंगाबाद, जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांना भेटी देऊन पथक माहिती घेणार आहे. त्या नंतर अहवाल केंद्राला सादर केला जाईल, असे जाधव यांनी सांगितले. 23 नोव्हेंबरला नागपूर येथून हे पथक दिल्लीला रवाना होणार आहे. पथकात तीन जण आहेत.

जनावरांमध्ये लसीकरणानंतर किती प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती आली आहे, याबाबत तपासणी करण्यात येत आहे. त्या करिता जनावरांच्या लसीकरणापूर्वी आणि लसीकरणानंतर 7, 14, 21 आणि 28 या दिवसांनंतरच्या रक्तजलाचे (सिरम) नमुने घेऊन ते बेंगळुरूच्या राष्ट्रीय रोग परिस्थिती विज्ञान आणि रोग माहिती संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटनरी इपिडोमॉलॉजी अँड डीसीज इन्फॉर्मेटिक) या केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या तपासणीमधून हा अहवाल प्राप्त होताच रोगप्रतिकारशक्तीचे प्रमाण कळू शकणार आहे. मात्र हा अहवाल अजून प्राप्त झाला नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळे यांनी दिली. परंतु लम्पीच्या व्हायरसमध्ये कोणतेही जनुकीय बदल झाले नसल्याची माहिती पुणे येथील प्रयोगशाळेने तोंडी दिल्यो परकाळे यांनी सांगितले.

1 कोटींहून अधिक जनावरांचे लसीकरण

महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक जनावरांचे लसीकरण झाले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात लसीकरणामुळे संसर्ग घटल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले असली तरी प्रत्यक्षात जनावरांमध्ये ‘लम्पी’चा संसर्ग वाढल्याचे आढळत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक पाहाणी करण्यासाठी आले आहे. लम्पी त्वचा रोगामुळे मरण पावलेल्या जनावरांना शासकीय परिपत्रकानुसार मदत दिली जाते. गाय आणि म्हैस मरण पावल्यास 30 हजार रूपये, बैल मरण पावल्यास 25 हजार आणि वासरू मरण पावल्यास 16 हजार रूपये मदत दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...