आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाचा घाला:वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात, एका महिलेचा मृत्यू, 24 जण जखमी; चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमधील घटना

बल्लारपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील कीन्ही गावाजवळ 12 मे ला रात्रीच्या सुमारास लग्नाची वरात घेऊन जाणारी खाजगी बस नाल्यात कोसळल्याने 1 महिला प्रवाश्याचा मृत्यू झाला तर 24 नागरिक जखमी झाले असून यामध्ये 6 जण गंभीर जखमी आहे.

तालुक्यातील कीन्ही गावाजवळ सदर दुर्घटना घडली, लग्न समारंभ आटोपून रात्री 10 च्या सुमारास खाजगी बस प्रवाश्याना घेऊन राजुरा कडून नांदगाव जायला निघाली होती. रात्रीच्या सुमारास वळणावर बस वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखालील नाल्यात बस कोसळली, अचानक घडलेल्या या घटनेत मोठा आवाज आल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत बल्लारपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली असता पोलिस प्रशासन व स्थानिक नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. बसमध्ये तब्बल 60 प्रवासी होते, या घटनेत 50 वर्षीय सुनंदा हरिदास मडावी यांचा मृत्यू झाला तर 24 नागरिक जखमी झाले. जखमी नागरिकांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास बल्लारपूरचे प्रभारी पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे.

सात जण जखमी

माणगाव म्हसळा मार्गावर मोर्बा घाटात आज सकाळी पर्यटकांच्या दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सात जण जखमी झाले आहेत. डोंगरोली गावच्या हद्दीत हा अपघात झाला असून मुंबईहून परत येणाऱ्या 108 रुग्णवाहीकेने मदतकार्य करत सर्व जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.