आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंद्रपूर कोरोना:क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या, एकाच दिवशी दोन संशयितांचे मृतदेह सापडले

चंद्रपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक व्यक्ती नागपूर तर दुसरी व्यक्ती मध्य प्रदेशातून आल्यानंतर केले होते क्वारंटाइन

जिल्ह्यातील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात क्वारंटाइन करण्यात आलेल्या एका 30 वर्षीय युवकाने आत्महत्या केली. पोलिसांनी शनिवारी जारी केलेल्या माहितीनुसार, नागपूर येथून चंद्रपूरला आल्यानंतर त्याला महाविद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले होते. परंतु, त्याने टोकाचे पाउल उचलले. अशाच प्रकारे याच परिसरात आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. त्याला सुद्धा दुसऱ्या शहरातून आल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आले होते. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहे.

चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालयाकडून दिलेल्या माहितीप्रमाणे, शनिवारी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन मृतदेह सापडले आहेत. यातील 30 वर्षीय युवक जिल्ह्यातील श्यामनगर परिसरात राहत होता. तो नुकता नागपूर येथून परतल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्याला सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका खोलीत क्वारंटाइन केले होते. परंतु, त्याने अचानक टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अशाच पद्धतीने एका 40 वर्षीय व्यक्तीला मध्य प्रदेशातून आल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आले होते. कुटुंबियांनी कित्येक फोन केल्यानंतर तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. अखेर त्याच्या खोलीत जाऊन चौकशी केली असता त्याचा मृतदेह सापडला. या दोघांमध्ये कोरानाची लक्षणे दिसून आलेली नव्हती. तरीही त्यांच्या मृत्यूनंतर कोरोना व्हायरसची तपासणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...