आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी कोळसा खाणीच्या एंट्री गेट वर दोन सुरक्षा रक्षकांच्या डोक्याला बंदूक लावून कोल माफियांनी तीन ट्रक आत कोल स्टॉकवर नेले आणि तेथून कोळसा भरून त्याच पद्धतीने बाहेर घेऊन गेले. यामुळे वेकोलीच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगली असून लाखो रुपयांचा कोळसा अवैध मार्गाने चोरी जात आहे. यामुळे वेकोलि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रविवार २२ मार्च रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेने खळबळ माजली आहे. दोन सुरक्षा गार्ड ट्रकच्या एंट्री गेटवर कार्यरत असताना अचानक दोघांनी येऊन या दोन्ही सुरक्षा रक्षकांवर देशी कट्टा सदृश्य बंदूक ताणली. यामुळे घाबरलेले हे सुरक्षा रक्षक काहीच करू शकले नाहीत. यानंतर ट्रक क्रमांक एमएच ३४ बीजी ९५९५, ट्रक क्रमांक एमएच ३४ बीझेड ०४३० आणि एमएच ३४ बीजी ६५०० हे कोल स्टॉक वर गेले. तेथे कोळसा लोडिंग मशीनद्वारे तिन्ही ट्रक भरून एकाच वेळी गेट बाहेर काढण्यात आले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने वेकोलि सुरक्षा अधिकारी आणि राजुरा पोलिसांना माहिती दिली. पोलिस ४.३० वाजता घटनास्थळी पोहोचले. यानंतर सकाळी घटनेची तक्रार राजुरा पोलिसांकडे नोंदविण्यात आली.
राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांना माहिती मिळताच या सभोवती सर्व मार्गाची नाकाबंदी करून ट्रक पकडणे शक्य झाले असते, मात्र अशा प्रकारची प्रयत्न झाला नसल्याचे समजते. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.