आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार, हल्ल्यात रावत यांच्या डाव्या हाताला इजा

मूल/चंद्रपूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर आज गुरुवार दि.११ मे रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मुल येथे गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात रावत यांच्या डाव्या हाताला गोळी स्पर्शून गेल्याने त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली.

हल्लेखोर स्विफ्ट डिझायर गाडीने आले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर नागपूर मार्गे पसार झाले . -सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे सी.डी.सी.सी.बँक शाखा मुल समोरून आपल्या स्कूटीकडे जात असताना बँकेचे समोर काही अंतरावर रोडवर उभ्या असलेल्या स्विप्ट गाडी नंबर ( MH 34 6152) यात बसून असलेल्या बुरखा धारक व्यक्तीने रावत यांचेवर गोळीबार केला.

यात त्यांच्या डाव्या हातावर गोळी लागली असून त्यांना दुखापत झाली. गोळी झाडताच गाडीसह मारेकरी पसार झाले. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली. गोळी हातावर लागून बाहेर गेल्याने ते बालंबाल बचावले. मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान याघटनेने परिसरात खळबळ उडाली. हल्ल्याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.