आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:एक लाख कॉलद्वारे नागरिकांच्या कोरोनासंबंधीच्या समस्यांचे निराकरण; कोरोना कॉल सेंटर उपक्रम राबवणारा चंद्रपूर राज्यातील एकमेव जिल्हा

नागपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना कॉल सेंटर उपक्रम राबवणारा चंद्रपूर राज्यातील एकमेव जिल्हा आहे.

लॉकडाऊन काळात अडकलेले नागरिक, प्रवासी व मजूर तसेच जिल्ह्यातील नागरिकांना होम आयसोलेशन, मानसिक आरोग्य व स्वास्थ्या संदर्भात योग्य ती माहिती देण्यासाठी जिल्ह्यात कोरोना कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. २३ मार्च पासून हा उपक्रम जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यत १ लाख नागरिकांशी थेट संवाद साधून माहिती देऊन मार्गदर्शन व मदतीचा हात दिला आहे.

कोरोना कॉल सेंटर उपक्रम राबवणारा चंद्रपूर राज्यातील एकमेव जिल्हा आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात या कॉल सेंटरच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात बाहेरील राज्यातून तथा जिल्ह्यातून येणारे प्रवासी, मजूर तसेच क्वॉरंन्टाईन करण्यात आलेले व्यक्ती याच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. नंतरच्या काळात पॉझिटिव्ह रुग्ण तसेच त्यांच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे कार्य केले.

जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी योग्य ती मदत व माहिती कोरोना कॉल सेंटर द्वारे देण्यात आली. सध्या या केंद्रामार्फत होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णांशी रोज संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात येत आहे तसेच त्याबाबत त्या-त्या प्रभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या रुग्णाच्या प्रकृतीची योग्य ती माहिती वेळोवेळी देण्यात येते. जिल्ह्यातील कोराेना रुग्णालयातील उपलब्ध खाटांच्या संख्येबाबत माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना व नागरिकांना कॉलद्वारे देण्यात येते. या संपर्क केंद्राचे काम कक्ष अधिकारी डॉ. किशोर भट्टाचार्य पाहात असून जिल्हा प्रशासनातील 150 कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...