आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने फिल्मी स्टाईल वाहनाचा पाठलाग करत अवैध गोवंश तस्करीचा पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेला वाहनात गोवंश कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तात्काळ पथकाला कारवाई करण्याचे निर्देशित केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मूलवरून त्या वाहनाचा पाठलाग केला, वाहन चालकाला संशय येताच तो वाहन निष्काळजीपणाने चालवू लागला. त्यानंतर राजुरा मार्गे ते वाहन हडस्तिकडे निघाले असता त्याठिकाणी वाहनावरून चालकाचे नियंत्रण गेले आणि वीज खांबाला ते वाहन धडकले.
अंधाराचा फायदा घेऊन वाहनचालक तिथून पसार झाला. मात्र पोलिसांनी वाहन क्रमांक MH34 BZ0210 ची झडती घेतली असता त्यामध्ये 31 गोवंश आढळून आले. मात्र त्यांचे हात, पाय अत्यंत निर्दयीपणे बांधून ठेवले असल्याचे आढळून आले.
राजुरा गोशाळेत दाखल
हे वाहन जप्त करत त्यामध्ये असलेले 7 गोरे, 4 बैल व 20 गाय यांना पुढील उपचार व पालनपोषण साठी राजुरा तालुक्यातील गोशाळेत दाखल करण्यात आले. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने एकूण 12 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी वाहनचालक यांच्याविरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पोउपनी अतुल कावळे, पोलीस कर्मचारी स्वामीदास चालेकर, महतो, दीपक, गणेश, अनुप, नितेश, गणेश, विनोद, मयूर, गोपीनाथ व दिनेश यांनी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.