आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंद्रपूर जिल्ह्यात पर्यटकांवर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झालाय. तर आणखी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये काही महिला आणि सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे.
नागपूरचे रहिवासी अशोक विभीषण मेंढे (62) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गुलाबराव पोचे (58) यांना डोंगर संकुलातून गंभीर अवस्थेत वाचवताना वाटेतच मृत्यू झाला.
कधी घडली घटना?
ही घटना शनिवारी दुपारी 2:00 वा 3:00 वाजेच्या सुमारास घडली असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तळोधी बाळापूर वनपरिक्षण केंद्र आणि तळोधी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोविंदपूर परिसरातील पेरजागड (सेव्हन सिस्टर्स हिल) या टेकडीवर पर्यटनासाठी नागपूरहून हे पर्यटक आले होते.
बेपत्ता पर्यटकांचा शोध
घटनाची माहिती मिळताच वनविभागाच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तळोधी, नागभीड पोलीस व स्वाब नेचर केअर संस्थेचे पदाधिकारी व सदस्य घटनास्थळी पोहोचले. बेपत्ता गुलाबराव पोचे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, नंतर त्यांना अत्यवस्थ अवस्थेत शोधून डोंगरावरून खाली रुग्णवाहिकेत नेले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
डोंगरावर मधमाशांच्या दंशामुळे अशोक मेंढे यांचा मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतदेह नागभीड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. रात्री 11 वाजेपर्यंत मदतकार्य सुरू होते. पुढील तपास तळोधी पोलीस व तळोधी वनविभाग करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.