आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेकडे बघितले म्हणून फटके!:मजुराला ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल! ब्रह्मपुरी - तालुक्यातील बेळगाव येथील घटना

चंद्रपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळ पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या मजुराने महिलेकडे टक लावून बघितल्यामुळे गावातील लोक संतप्त झाले. त्यानंतर या मजुराला त्यांनी ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील बेळगाव येथे घडली.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

बेळगाव येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून या कामाचे कंत्राट बीड जिल्ह्यातील भागवत जगताप या कंत्राटदाराला मिळाले आहे. हे काम करण्यासाठी बीड जिल्ह्यातील मजूर कंत्राटदारासोबत बेळगाव येथे गेले. 1 एप्रिलला पाईप टाकण्याचे काम सुरू असताना मजूर राहुल जगदाडे याला गावातील नागरिकांनी पकडत त्याला ट्रॅक्टरला बांधून मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हे कारण आले समोर

मारहाणीचे कारण म्हणजे राहुल जगदाडे यांनी गावातील महिलेकडे बघितले असता, तू का बघितला म्हणत त्याला दोरीने ट्रॅक्टरला बांधत बेदम मारहाण केली. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देत तक्रार देण्यात आली.

मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा

ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात याबाबत कंत्राटदार जगताप यांनी दिनेश अवसरे, निलेश अवसरे व गणेश अवसरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली, पोलिसांनी तिघांविरोधात कलम 341, 294, 352, 506, 323 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी अरुण पिसे करीत आहे.