आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादारु दुकानात ग्राहकांमध्ये भांडणे होणे नवीन नाही. अनेकदा वादावादीचे प्रकारही होतात. पण, दारू दुकानदाराचा संताप अनावर होऊन त्याने चक्क ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून ग्राहकाला गंभीर जखमी केल्याची घटना चंद्रपुरातील जटपुरा गेट जवळीक आनंद वाइन शॉप येथे घडली आहे.
दुकानाचे संचालक संदीप अडवाणी ह्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार शहरातील जटपुरालगत असलेल्या आनंद वाइन शॉपचे मालक चंद्रकांत अडवाणी यांचा मुलगा संदीप अडवाणी याने शुल्लक वादातून एका ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडली. त्यात तरुण ग्राहक गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या ग्राहकाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी संदीप अडवाणी याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 8ः30 वाजता घडली.
मद्यापींची कायम गर्दी
शहरातील अत्यंत गजबजलेल्या मार्गालगत हे दारूचे दुकान असून मद्यापींची येथे कायम गर्दी असते. जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर जटपुरा गेटलगत चंद्रकांत अडवाणी या दारू व्यावसायिकाने आनंद वाइनशॉप सुरू केले. या वाइन शॉपमुळे रस्त्यावर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सायंकाळी या मार्गावरून महिलांना ये-जा करताना मन:स्ताप सहन करावा लागतो.
शुल्लक कारणावरून भांडण
मंगळवारी रात्री एक ग्राहक वाइन शॉपमध्ये गेला असता शुल्लक कारणावरून भांडण झाले. वाद विकोपाला गेला काउंटरवर बसून असलेला चंद्रकांत अडवाणीचा मुलगा संदीपने ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडली. त्यामुळे तरूण रक्तबंबाळ झाला. या मारहाण प्रकरणी तरुणाच्या तक्रारीनंतर संदीप अडवाणीला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.