आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारी मुंड्या चीत करू:भाजप इलेक्शन मोडवर, आज मुंबईत नव्या कार्यकारिणीची होणार घोषणा, बावनकुळेंची माहिती

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

2024 च्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना भाजपा इलेक्शन मोडवर आली आहे. उद्या बुधवार ३ मे रोजी मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

2024 च्या निवडणुकीत महाविजय मिळवण्यासाठी आमची तयारी आहे. तसेही प्रत्येक तीन वर्षांनंतर कार्यकारिणीत बदल होतात. आता साडेतीन वर्षे झाली आहे. त्यामुळे मोठे फेरबदल आज दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष कार्यालयात घोषणा करण्यात येईल. यावेळी भाजपमधील येणाऱ्या निवडणुकीतील २८८ विधानसभा समन्वयक लवकर जाहीर होईल. १५ मे पर्यत जिल्हाध्यक्षांची नवीन टिम येईल. सर्व फेरबदल मेमध्ये होतील, असे ते म्हणाले.

ज्येष्ठांसाठी अमृतकुंभ अभियान

जनसंघाच्या काळापासून काम करणार ज्येष्ठ कार्यकर्ते व नेत्यांसाठी नानासाहेब उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियान सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील हजार ते दीड हजार ज्येष्ठ सहभागी होतील. १०५ पदाधिकारी, २५० विशेष निमंत्रीत, आमदार, खासदार, ७०५ निमंत्रीत सदस्य. ११०० ते १२०० नेते अशी कार्यकारिणी राहाणार आहे. 2024 च्या ४८ लोकसभेच्या जागा व २०० पेक्षा जास्त विधानसभा जिंकण्यासाठी प्रयत्न आहे.श्

चारी मुंड्या चीत करू

आधी बारसुच्या बाजूने असणारे उद्धव ठाकरे आता विरोधासाठी बारसूला भेट देत आहे. ते नौटंकीबाज आहेत. ते आधी बाजूने होते. आता नाटक करीत आहे. निराश, चिंताग्रस्त झालेले ठाकरे उसना आवेश आणून बोलत आहे. त्यांनी काॅपी रायटर बदलला पाहिजे. त्यांच्या भाषणाला लोक तर कंटाळलेले आहेच. शिवाय व्यासपीठावरील नेतेही त्यांचे भाषण ऐकत नाहीत असा टोला बावनकुळे यांनी हाणला. 2024 मध्ये रणांगणात या आणि विधानसभा लढा. चारी मुंड्या चित करू असे आव्हान त्यांनी दिले.