आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे.'' असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. तर या विधानाचे अनेक तर्कवितर्क आता लावले जात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे आज पूर्व नागपूर येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यात उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केले. विशेषतः या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
मनातील गोष्ट आज ओठावर
राज्यातील सत्तासंघर्षाची लढाई सुप्रीम कोर्टात असताना सरकारचे भवितव्यही अंधारात आहे. त्यातच आता मुख्यमंत्रीपदावर दावे, प्रतिदावे केले जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील अशी पत्रकार परिषदेत घोषणा केली गेली त्यावेळी अनेकांना धक्का बसला आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपजनांची इच्छा होती तिला छेद बसला. त्यानंतर आजही भाजपमधील अनेकांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हे वाटते. त्यातूनच चंद्रशेखर बावनकुळेंच्या मनातील गोष्ट आज ओठावर आली.
फडणवीसांनी अन्याय दुर केला
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जो - जो समाज त्यांच्याकडे गेला, ज्या-ज्या समाजावर अन्याय झाला. तो अन्याय देवेंद्र फडणवीसांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज आपली सर्वांची जबाबदारी आहे, किमान मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभे राहायला हवे. महाराष्ट्राचे भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस बदलू शकतात.
फडणवीस जातीपातीपलिकडले
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, फडणवीस हे जाती - पातीच्या पलीकडे गेलेले नेते आहेत. ते सर्व समाजासाठी काम करतात, म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे की, 2014 ते 2019 चा काळ पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे.
चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रश्न
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे काय झाले पाहिजेत? असा प्रश्न विचारत बावनकुळेंनी लोकांकडूनच प्रतिसाद घेतला. लोकांनी ‘मुख्यमंत्री’ असे उत्तर दिल्यानंतर बावनकुळेंनी संबंधित विधानाला सहमती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.