आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राज'कारण:उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केल्याने त्यांचा भाजप नेतृत्वाने बदला घेतला; चंद्रशेखर बावनकुळे यांचे उत्तर

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या नेतृत्वाने विश्वासघात केलेल्या लोकांना जागा दाखविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरत आमदार निवडून आणले, आणि नंतर त्यांनी बेईमानी करत मविआसोबत सत्ता स्थापन केली. विश्वास घाताचे राजकारण कुणी संपवले हे सर्वांना माहिती आहे, मोदी आणि अमित शहा यांनी विश्वासघातक्यांना संपवले आहे, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

मविआची बोंबाबोब सभा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा आक्रोश पाहून असे म्हणता येईल की हा बोंबाबोब सभा होती. कालच्या भाषणात खोटारडेपणाचा कळस होता, तुमच्या घरातील 40 लोक निघून जातात आणि तुम्ही अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात, तुमची उंची तितकी आहे का असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी पळून गेले असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या पोटात आणि ओठात सावरकरांबद्दल वेगळी भुमिका आहे. एकाच सभेत सावरकराबद्दल 3 भूमिका घेणारे लोक असल्याने नाना पटोले सभेला आले नाही.

मविआकडून मराठवाड्यावर अन्याय

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मराठवाडा वैधानिक मंडळ हवे असेल तर राज्यापालनियुक्त 12 आमदार आणून द्या, अन्यथा मराठवाड्याचा विकास करणार नाही, ना वैधानिक मंडळ देणार नाही असे अजित पवारांनी मविआची सत्ता असताना म्हटले होते, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. असे बोलणाऱ्या व्यक्तीला छत्रपती संभाजीनगरात येण्याचा काय अधिकार आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना काय अधिकार आहे मराठवाड्यात येण्याचे, त्यांनी सत्तेत येताच वॉटर ग्रीड योजना रद्द करण्यात आली, त्यामुळे सर्व जिल्हे पाण्याखाली असते. संभाजीनगरचा निर्णय केंद्र सरकार करणार होते. केंद्रात उद्धव आहे का असा एकेरी सवालही त्यांनी यावेळी केला. केंद्र सरकारने मान्यता दिली, सत्तेतील मंत्रिपद गेल्याने सर्व जण सत्ता वापस मिळविण्यासाठी खोटे बोलत आहेत. पीक विमा कंपन्याना पोसन्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले.