आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्तीची घोषणा:केमिस्ट-फार्मासिस्ट प्रकोष्ट राज्य संयोजकपदी श्रीकांत दुबे

नागपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केमिस्ट-फार्मासिस्ट प्रकोष्टच्या प्रदेश संयोजकपदी नागपूर येथील श्रीकांत दुबे यांची नियुक्ती केली. यासोबतच आघाडीच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही नियुक्तीची घोषणा केली. मुंबई येथील प्रदेश मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी श्रीकांत दुबे यांना नियुक्तिपत्र दिले. या वेळी त्यांनी केमिस्ट फार्मासिस्ट क्षेत्रात पक्षसंघटनेवर भर देत त्यांच्या प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी काम करावे, अशा सूचना केल्या. श्रीकांत दुबे यांनी नियुक्तीसाठी त्यांचे आभार मानले व या क्षेत्राला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, असे सांगितले. दुबे यांनी या वेळी केमिस्ट-फार्मासिस्ट प्रकोष्टच्या सहसंयोजकपदी नितीन मणियार (मुंबई), अनिल बेलकर (पुणे), सुनील भंगाळे (जळगाव), दीपक कोठारी (नांदेड) व रविकांत पाटील (नागपूर ग्रामीण) यांची नियुक्ती केली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...