आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुरवणी मागण्यांवर चर्चा करताना छगन भुजबळ यांनी मुंबईचा उल्लेख कोंबडी असा केल्याने सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी आक्षेप घेत गदारोळ केला. त्याला विरोधी बाकावरील सदस्यांनीही प्रत्युत्तर दिल्याने गोंधळ झाला. तालीका सभापती समीर कुणावार यांनी सभागृह 10 मिनिटे तहकूब केले.
छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. ती कापून खायची का असा उल्लेख छगन भुजबळ यांनी केला. त्यावर भाजपा सदस्य मनीषा चौधरी यांनी जोरदार आक्षेप घेत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. राम सातपुते, योगेश सागर यांनीही आक्षेप घेतला. मनीषा चौधरी यांनी मुंबईला कोंबडी म्हणणे हा मुंबईचा अपमान असल्याचे सांगितले. त्यावरून गदारोळ होताच दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
सभा तहकुबीनंतर सुरू होताच योगेश सागर यांनी महिलांची माफी मागितली पाहिजे असे सांगितले. छगन भुजबळ यांनी मनीषा चौधरी यांना "ए, तु खाली बस' असा एकेरी उल्लेख केला. व्हिडिओ तपासा आणि निर्णय घ्या असे योगेश सागर यांनी सांगितले. वाद थांबत नसल्याचे पाहून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छगन भुजबळ यांनी सन्मानपूर्वक खाली बसा असा उल्लेख केल्याचे सांगून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, सत्ताधारी सदस्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते पाहून अध्यक्ष व्हिडिओ तपासून निर्णय घेतील असे तालीका सभापती कुणावार यांनी जाहीर केले. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी दिलगिरी व्यक्त केली.
या नंतर सभागृहाचे कामकाज निवळत असताना छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुलेंबद्दल घाण घाण बोलणाऱ्या राज्यपालांबद्दल कोणी काहीच बोलत नाही असे हिणवले. त्यावर दोन्हीकडील सदस्य आक्रमक होताच पुन्हा दहा निमिटांसाठी सभागृह तहकूब केले. दुसऱ्यांदा तहकुबीनंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर आल्यानंतर कामकाज सुरळीत सुरू झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.