आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनहित याचिका फेटाळून लावली:कोंबड्यांच्या झंुजीला अधिकृत करता येणार नाही : न्यायालय

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील कोंबड्यांच्या झुंजीला अधिकृत खेळाचा दर्जा मिळावा यासाठी केलेली जनहित याचिका फेटाळून लावली. या खेळाला अधिकृत करूनही यातील प्राणी क्रूरता कमी होणार नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

राज्यामध्ये कोंबड्यांच्या झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी याकरिता शेतकरी गजेंद्र चाचरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र ती फेटाळली. याचिकेत केंद्र व राज्य शासनातील पशुसंवर्धन विभागाचे सचिव आणि पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्तांना प्रतिवादी करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...