आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला समृद्धी महामार्गाचा आढावा, येत्या 1 मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर आहेत, त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली.

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज घेतला. समृद्धी महामार्गाचे काम चांगल्या दर्जाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.1 मे 2021 पर्यंत नागपूर-शिर्डी प्रवास सुरू होईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, तेव्हा सर्वोत्तम महामार्ग असेल, त्याचा निश्चित महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असेसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. दरम्यान माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, समृद्धी महामार्ग कधी पूर्ण होतो याची उत्सुकता महाराष्ट्राला पण आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा सर्वोत्तम महामार्ग असेल. याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल. तसेच कोरोना काळात कामात खंड पडेल असे वाटले होते. मात्र हे काम मंदावलेले नाही. येत्या 1 मेपर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकतो. येत्या 1 मेपर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ. त्याच्या पुढच्या म्हणजेच 1 मे 2022 पर्यंत आपण मुंबईपर्यंत गेलेलो असू असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमधील एक प्रकल्प आहे. एकूण 710 किलोमीटरचा हा द्रुतगती महामार्ग असणार आहे. जवळपास 56 हजार कोटी रुपयांचा खर्च यामध्ये लागू शकतो. या महामार्गामुळे मुंबई-नागपूर हा प्रवास अवघ्या सहा तासांत करणे शक्य होणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser