आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्र्यांचे लक्ष संपूर्ण महाराष्ट्रात आहे. विकासापासून कुठलाही भाग वंचित राहणार नाही. साडेतीनशे कोटींच्या कामाचे भूमिपूजन भंडारा येथे होणार आहे. विदर्भाला निधी देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली.
लोकांना हवे असलेले सरकार राज्यात आहे. जनतेने खऱ्या अर्थाने कौल दिलेले सरकार दहा महिने अगोदर सत्तेत आले. या कालावधीत जवळपास साडेबारा हजार कोटी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. त्यामुळे सर्वांना आपला मुख्यमंत्री असल्याचे जाणवत आणि हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. जिथे जातो तिथे लोक प्रेमाने स्वागत करतात असे ते म्हणाले.
टीकेचा स्तर घसरलेला असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्रदूषित करण्याचे काम सध्या सुरू आहे. सकाळपासून शिव्या शाप देण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. महाराष्ट्राने यापूर्वी अशा पद्धतीने टिका पाहिलेली नाही. आता मात्र आपसातच एकमेकांवर टीका होताना दिसून येत आहे. सत्तेसाठी विचारांना बाजूला करून हे एकत्र आले आहे. वज्रमुठ एकजूट दाखवत आहे. मात्र ती वज्रमुठ राहते की वज्रझुठ ठरते हे पाहावे लागेल.
निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या म्हणजेच सत्याच्या बाजूने लागला. बहुमत आमच्याकडे आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पुढारी कंत्राटदाराची भाषा करीत आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंवर केली. तर सगळ्यांना स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. लोक दिवसा स्वप्न पाहतात. आम्ही त्यावर भाष्य करणार नाही, असे म्हणात जयंत पाटलांच्या प्रश्नाला बगल दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.