आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पावसाचा कहर:चिमुकल्यास टबमध्ये टाकून पुरातून वाचवले; पूर्व विदर्भात पावसाचे थैमान, 48 हजार लोकांचे स्थलांतर

नागपूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना मोठा फटका

अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील गोंडपिंप्री येथे सैन्यदलाने केलेल्या बचावकार्यात वाचवलेला चिमुकला सुखरूप आईकडे सोपवण्यात आला. दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा नागपूर विभागातील १४ तालुक्यांना फटका बसला असून ४८ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. भंडारा जिल्ह्यात ५५ हजार लोकांना पुराचा तडाखा बसला.

0