आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक:नागपुरात 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; वडिलांसह आरोपीवर गुन्हा दाखल

नागपूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी तालीब कमाल उर्फ बैहरा खालीद अंसारी (वय 53) याला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध भादंवि कलम 371 (1), (ए), 377, 506, तसेच पोक्सो कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तालीब कमाल उर्फ बैहरा खालीद अंसारी व पीडित मुलीचे वडील हे दोघेही ठिय्या कामगार असून एकाच वस्तीत राहातात. दोघेही एकमेकांना ओळखत होते व दोघांचेही एकमेकांच्या घरी येणेजाणे होते. घटनेच्या दिवशी रात्री आरोपी तालीब कमाल उर्फ बैहरा खालीद अंसारी हा पीडित मुलीच्या घरी गेला. त्यावेळी पीडितेची आई, पीडित मुलगी व तिचा 3 वर्षीय भाऊ घरी होते. त्याने वडील दिसत नाही, असे विचारले असता पीडितेच्या आईने अजून आले नाही, असे सांगितले. त्यावरुन आरोपी तालीब कमाल उर्फ बैहरा खालीद अंसारी याने मी त्यांना शोधून आणतो, असे सांगत मुलगी व तिच्या भावाला घेऊन गेला.

गुन्हा दाखल

दहा मिनिटांनी आरोपीने तीन वर्षाच्या भावाला टॅक्सीत बसवून घरी पाठवून दिले. बराच वेळ वाट पाहूनही मुलगी परत न आल्याने तिची शोधाशोध केली असता ती मामाकडे आढळून आली. मुलगी रात्रभर काहीही बोलली नाही. सोमवारी सकाळी तिने झालेला प्रकार आईला सांगितला. त्यावर संतप्त झालेले आई-वडील मुलीला घेऊन आरोपीच्या घरी गेले. तिथे पीडित मुलीच्या वडीलांनी आरोपी तालीब कमाल उर्फ बैहरा खालीद अंसारी याला मारहाण केली. यात आरोपीचा पाय मोडला. नंतर मुलीच्या आईच्या तक्रारी वरून आरोपीला अटक करण्यात आली. तर आरोपीच्या तक्रारीवरून पीडित मुलीच्या वडिलां विरुद्ध कलम 325 नुसार गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...