आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार:चॉकलेटचे आमीष दाखवून चिमुकलीवर बलात्कार, पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरात गुन्हेगारी प्रवृत्ती नव्याने डोके वर काढीत आहे. मधल्या काळात ब्रेक घेतल्यासारखे गुन्हेगार शांत होते. आता ते बाहेर निघाल्याचे चित्र आहे. प्रताप नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाॅबी प्रमोद जंगले (वय २५) याने चॉकलेटचे आमीष दाखवून एका साडेचार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. गुन्हा एप्रिलमध्ये घडूनही मंगळवार, ७ जून राेजी या प्रकरणी प्रताप नगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७६ (ए) (बी), ५०६ (ब) पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या एका घटनेत बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या मुलीच्या मुलीवर म्हणजे आपल्या नातीवर आजाेबानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या महिलेला तिची १४ वर्षीय मुलगी आणि तिचे वडील एका खोलीत नको त्या अवस्थेत आढळले. तिने मुलीला घेऊन सोमवारी रात्री कपिलनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्या नंतर पोलिसांनी बलात्कारी आजोबास अटक केली आहे. नागपुरात अलिकडे लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ होत असल्याचे दिसून येत अाहे. आईवडिलांनी आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...