आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्घृण हत्या:गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानाजवळ जुगार अड्डा चालकाचा सिनेस्टाईल खून

नागपूर7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानापासून पाऊण किलोमीटर अंतरावरील भर गर्दीच्या भोले पेट्रोल पंपासमोर कुख्यात जुगार अड्डा चालक बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची भर पावसात सिनेस्टाईल खून झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी एका बिअर बारमध्ये तलवारी नाचवून धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगारांची वरात पोलिसांनी काढली होती. त्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच ही घटना घडली.

बाल्या बिनेकरचे गोळीबार चौकात सावजी भोजनालय असून तो जुगार अड्डाही चालवायचा. तो अमरावती रोडने निघाल्यापासून चार ते पाच आरोपी त्याच्या मागावर होते. भोले पेट्रोलपंप चौकात आरोपींनी बाल्याची कार थांबवून त्याच्यावर चाकू व कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यात बाल्या जागीच ठार झाला. त्यानंतर आरोपींनी मोटारसायकलवरून पळ काढला.

बातम्या आणखी आहेत...