आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरमध्ये मॅनहोल्सच्या स्वच्छतेसाठी 3 रोबोट:14  दिवसांत 390 मॅनहोल्सची केली स्वच्छता, दहमहा 7 लाख 47 हजार रु. भाडे

प्रतिनिधी/नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या शहरीकरणामुळे सीवर मॅनहोल्सच्या स्वच्छतेचा मोठा प्रश्न उभा झाला आहे. मोठ्या मशिन्समुळे रुंद रस्‍त्यावर सीवेज चेंबरची स्वच्छता करण्यास मदत होते, पण अरुंद रस्त्यावर हे करणे अडचणीचे ठरते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नागपूर स्मार्ट सिटी रोबोटद्वारे स्वच्छता प्रणालीची मदत घेत आहे. शहरातील मॅनहोल्सची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना सीवरलाईनच्या मॅनहोलमध्ये प्रवेश न करता ते सुरक्षितपणे स्वच्छ करता यावे, या प्रमुख उद्देशपूर्तीसाठी नागपूर स्मार्ट सिटीने तीन स्वच्छता रोबोट भाडेतत्वावर घेतले आहेत. या रोबोटद्वारे मागील १४ दिवसांत शहरातील ३९० मॅनहोल्स स्वच्छ करण्यात आली आहे.

दरमहा ७ लाख ४७ हजार भाडे

अत्याधुनिक रोबोटचा वापर करण्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ, शहरातील विविध भागांमध्ये वाहतुकीसाठी लागणारे वाहन व खर्च, रोबोटची देखभाल दुरुस्थी आणि इतर सर्व खर्च मिळून या तिन्ही रोबोटचे भाडे ७ लाख ४७ हजार दरमहा असणार असले, तरी कामानुसार लक्ष्यपूर्तीनुसार भाडे दिले जाणार आहेत. या रोबोटची किंमत जीईएम पोर्टलवर ३९ लाख ५२ हजार रुपये इतकी आहे. केवळ रोबोट घेऊन काही साध्या होणार नव्हते, त्याद्वारे उत्तम काम व्हावं, मशिनची उत्तम देखरेख व ती योग्य कार्यान्वित व्हावी हा भाडे तत्त्वावर घेण्यामागील उद्देश आहे. प्रत्येक रोबोट मागे चार लोकांचा टीम असून त्यात एक ऑपरेटर, एक सुपरवायझर आणि दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यांचा खर्च कंत्रादारांकडून केला जात आहे.

२५० मॅनहोल्सची स्वच्छता करण्याचे लक्ष्य

प्रत्येक रोबोटला शहरातील २५० मॅनहोल्सची स्वच्छता करण्याचे लक्ष्य देण्यात आले असून लक्ष्यपूर्ती झाल्यास पूर्ण भाडे दिले जाईल. शिवाय २५० पेक्षा कमी मॅनहोल्सची स्वच्छता केल्यानंतर सदर कंपनीला ७५ टक्के रक्कम व २०० पेक्षा कमी मॅनहोल्सची स्वच्छता केल्यास त्यांना ५० टक्के रक्कम देण्याचे ठरले आहे. तिन्ही रोबोटला शहारातील एकूण ७५० मॅनहोल्सची स्वच्छता करणे अपेक्षित आहे. ही संपूर्ण प्रक्रिया मनपा अधिकाऱ्यांनी सुनिश्चित केल्यावरच सदर कंपनीला पैसे दिले जातात.

5 वर्षांनंतर रोबोट स्मार्ट सिटीच्या मालकीचे

शहरातील मॅनहोल्सच्या स्वच्छतेला गती मिळाली आहे. करारानुसार पाच वर्षांनंतर हे रोबोट स्मार्ट सिटीच्या मालकीचे होणार आहेत. या रोबोटद्वारे नागपूर महापालिकेच्या सतरांजीपूरा, लकडगंज आणि गांधीबाग या झोन मध्ये गत १४ दिवसात ३९० मॅनहोल्सची स्वच्छता करण्यात आली आहे. रोबोटद्वारे केल्या जाणाऱ्या स्वच्छतेची माहिती ही जीपीएस प्रणालीद्वारे मिळते. रोबोटच्या कार्यक्षमतेमुळे सदर रोबोटची मागणी इतर झोन मध्येही अधिक प्रमाणात केल्या जात असून, प्रत्येक झोनमध्ये या रोबोटद्वारे स्वच्छता केल्या जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...