आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''अजित पवारांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभणारी नाही आहे. खोक्यांचा एकावर एक ढिग लावला तर ‘शिखर’ इतके उंच होईल की, तिथेपर्यंत नजर पोहचणार नाही. तिथून कडेलोट होईल. अजित पवारांच्या तोंडून ही भाषा शोभत नाही'' असे खोक्यांच्या राजकारणावर उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मविआवर टीका केली. ''2019 ला जे सरकार स्थापन झाले. ते पूर्णपणे अनैतिक होते. सोयरिक एकाशी केली, संसार दुसऱ्याशी थाटला, हे जनतेला माहिती आहे'' असा टोला त्यांनी लगावला.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी विरोधकांची पत्रकार परिषद झाली होती. विरोधकांच्या मुद्द्यांवरही जोरदार प्रत्युत्तर शिंदे फडणवीस यांनी आज दिले.
50 आमदारांमुळे नागपुरात आलो
एकनाथ शिंदे म्हणाले, नागपूर आणि विदर्भात यापूर्वी कार्यकर्ता म्हणून यायचो. नंतर मंत्री म्हणून आलो. आता बाळासाहेब ठाकरे, दिघेंच्या आशीर्वादाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 50 आमदार यांच्यामुळे मुख्यमंत्री म्हणून विदर्भात येण्याची संधी मिळाली.
मविआचे अनैतिक सरकार होते!
बाबासाहेबांच्या घटनेनुसार कायदेशीर बहुमताच्या जोरावर हे सरकार स्थापन झाले आहे. तेही लोकांच्या जनमताचा आदर राखून. मागे विधिमंडळाच्या कारभारावर स्थगिती द्या, अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र, कोर्टाने ती फेटाळून लावलेली. 2019 ला आलेले सरकार घटनाबाह्य असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
लवासा करायचा नाही
एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवारांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभणारी नाही आहे. खोक्यांचा एकावर एक ढिग लावला तर ‘शिखर’ इतके उंच होईल की, तिथेपर्यंत नजर पोहचणार नाही. तिथून कडेलोट होईल. तसेच, अनेक विभागांत तरतूद होती दोन हजार कोटींची आणि सहा ते सात हजार कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली. आमदनी अठ्ठनी खर्च रुपय्या. आम्हाला राज्याचा लवासा करायचा नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.