आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांच्या खिशाला झळ:पुन्हा एकदा सीएनजी महागला; प्रतिकिलो 6 रुपयांची वाढ, राज्यात सर्वांधिक दर नागपुरात

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरात सीएनजीचे दर प्रती किलो 6 रुपयांनी वाढले आहेत. जुने दर प्रति किलो 110 रूपये होते. राज्यातच नव्हे तर देशातील सर्वात महाग सीएनजी नागपुरात विकला जात आहे. राज्यातील सर्वात स्वस्त सीएनजी हे नाशिकमध्ये असून दर 67.90 रुपये आहे. महाराष्ट्रात सीएनजी सरासरी 82.60 रुपायांना विकले जात आहे. इंधनदरातील वाढीमुळे नागरिक त्रस्त असताना सीएनजीचा पर्याय वाहनधारकांसाठी होता.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होते. मात्र सीएनजीच्या दरातही झपाट्याने होणारी वाढ नागरिकांची चिंता वाढवत आहे. नेहमीच पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर म्हणून सीएनजी कडे बघितल्या जातं. मात्र नागपूर शहरात सीएनजीच्या दराचा उडाला भडका आहे. शहरात मोजकेच सीएनजीचे विक्रेते असून विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षाही महाग सीएनजी नागपूरात विकले जात आहे.

नागपूरमध्ये आजचा सीएनजीचा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे व डिझेलचे दर 92 रुपये 60 पैसे आहे. मुंबईत सीएनजी 80 रुपये दराने विकले जाते. सीएनजी वितरण कंपनी ग्राहकांना सरकारी सबसिडी न देता गॅस विकत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे एवढ्या महाग दरात सीएनजी विकत घ्यावा लागत असल्याचा आरोपही ग्राहकांनी केला आहे.

राज्यातील विविध शहरातील सीएनजीचे दर

नागपूर 116 रुपये

पुणे- 85 रुपये

पिंपरी चिंचवड- 85 रुपये

मुंबई 80 रुपये

नवी मुंबई- 80 रुपये

ठाणे- 80 रुपये

नाशिक - 67.90 रुपये

धुळे- 67.90 रुपये

बातम्या आणखी आहेत...