आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली:शिवनाथ एक्स्प्रेसचे डबे घसरले; वेग कमी असल्याने हानी टळली

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील कोरबाहून नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या शिवनाथ एक्स्प्रेसचे डबे सोमवारी मध्यरात्री रुळावरून घसरल्याची घटना घडली. मात्र गाडीचा वेग कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी लागलीच गाडी पुढे रवाना केली.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्रीनंतर ३.४२ वाजेच्या सुमारास डोंगरगड यार्ड येथे कोरबाहून इतवारीकडे येणाऱ्या शिवनाथ एक्स्प्रेस क्रमांक १८२३९ या ट्रेनच्या दोन डब्यांची (क्रमांक एईसी १३४४०० आणि एईसी ०८४११४) पाच चाके रुळावरून घसरली. रात्रीच गोंदिया आणि इतवारी येथून अपघातग्रस्त मदत गाडी आणि अपघात वैद्यकीय सहाय्यता गाडी अपघातस्थळी रवाना करण्यात आली. या अपघातात एकही प्रवासी जखमी झाला नाही. ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. माहिती मिळताच डीआरएम, वरिष्ठ डीसीएम आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. री-रिलेसाठी टूलवन घटनास्थळी पोहोचले. गाडी काही विलंबाने रवाना करण्यात आली. -

बातम्या आणखी आहेत...