आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:महाजेनकोसाठी कोळसा खरेदी निविदामहामंडळाने नियम डावलून दिल्या; नाना पटोले यांच्या पत्राने खळबळ, नंतर केला खुलासा

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऊर्जा विभागाला पत्र लिहिले नाही : पटोलेंचा खुलासा

राज्य खनिकर्म महामंडळाने महाजेनकोसाठी होणाऱ्या कोळसा खरेदीसाठीची निविदा नियम डावलून दिल्याचा आरोप करणारे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्याने खळबळ उडाली. हे पत्र पटोले यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात लिहिल्याची चर्चा सुरुवातीला होती. परंतु, प्रत्यक्षात हे पत्र खनिकर्म महामंडळाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाले. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व सध्या अपक्ष आमदार असलेले आमदार आशिष जयस्वाल हे सध्या खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने महाजेनकोसाठी कोळसा पुरवठा व वाॅशिंगचे काम निविदा नियम डावलून एका कंपनीला दिले. ही कंपनी संजय हरदवाणी हे चालवत असून कंपनीचे कुठलेही नेटवर्क व टर्नओव्हर नाही. कंपनीचे सिक्युरिटी क्लिअरन्स नसून कंपनीला कोल वाॅशिंगचा कोणताही अनुभव नसल्याचे पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

ऊर्जा विभागाला पत्र लिहिले नाही : पटोलेंचा खुलासा
मी राज्याच्या ऊर्जा विभागाच्या विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याची बातमी एका दूरचित्रवाणीवर दाखवण्यात आली. ती बातमी पूर्णपणे असत्य आहे. हे पत्र खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत लिहले आहे, असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...