आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवे आव्हान:किनारपट्टीची तटरक्षक खारफुटीला हवे बेसुमार कत्तलीपासून संरक्षण

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे झाड आपल्या लागवडीसाठी स्वतःच सोय करते. याच्या बिया जड व मोठ्या असतात.
  • भारताच्या 7,517 किलोमीटर एवढ्या विस्तृत किनारपट्टीचे संरक्षण खारफुटी करते

भारताच्या ७,५१७ किलोमीटर एवढ्या विस्तृत किनारपट्टीचे संरक्षण खारफुटी करते. खारफुटी किनारपट्टीचे संरक्षण समुद्राच्या लाटा, वादळे, वारा यांपासून करतात. पण, अलिकडे बेसुमार कत्तलीमुळे खारफुटी धोक्यात आली आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी खारफुटीची कत्तल थांबणे आवश्यक असल्याचे बायोस्पीअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक सचिन पुणेकर यांनी सांगितले.

मिठागरांची निर्मिती, वाळू उपसा, अनाधिकृत बांधकामे, भराव टाकून वसतिस्थान निर्मिती, जळाऊ लाकडासाठी खारफुटीची कत्तल होत आहे. या शिवाय रासायनिक तसेच प्लास्टिक प्रदुषणामुळे धोका निर्माण झाला आहे. खारफुटीचे संरक्षण व संवर्धनासाठी वनखात्याने कांदळवन कक्ष स्थापन केला आहे. अलिकडे त्या मार्फत खारफुटी रोपवाटिकेचे काम हाती घेण्यात आल्याचे पुणेकर यांनी सांगितले. स्वत:च तयार करते स्वत:चे बी : या झाडांच्या मुळांना सतत पाण्यात राहावे लागते. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन कमी पडतो. परिणामी तिवरांची मुळे ही जमिनीतून वर, उलटी वाढतात. सर्वसाधारणपणे झाडाची मुळे खालच्या बाजूला वाढत असताना ही मुळे मात्र जमिनीतून वर येतात आणि मोकळ्या हवेत श्वास घेतात. हे झाड आपल्या लागवडीसाठी स्वतःच सोय करते. याच्या बिया जड व मोठ्या असतात. तिवरांच्या बियांची रुजण्याची प्रक्रिया झाडावरच सुरू होते, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. हे रोपटे जमिनीवर पडल्याबरोबर रुजते. धूप थांबवण्याचे काम सुरू करते. याच्या मुळांना शाखांचे जाळे असल्याने पटकन रुजायला मदत होते.

सागरी तटरक्षक वनस्पती : खारफुटीच्या दाट झाडीमुळे समुद्र व जमीन तसेच खाडी, किनारा व त्यावरील प्रदेश यांत एक हिरवी भिंत निर्माण होते. त्यामुळे किनाऱ्याजवळच्या जमिनीची पाण्यापासून होणारी धूप थांबते. भूसंरक्षणाच्या दृष्टीने या वनस्पती अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यामुळे इतर वनस्पती व जीवसृष्टीचे संरक्षण होते. जलचर प्राण्यांना संरक्षण मिळते. मासे, खेकडे, झिंगे वगैरे प्राणी येथे अंडी घालतात. पिले मोठी झाली की समुद्राकडे जातात. या वनस्पतीसमूहात झिंगे चांगले वाढतात.

वादळांपासून होते संरक्षण : तिवरांमुळे वादळांचा तडाखा सौम्य होऊ शकतो. हा अनुभव ओरिसा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारपट्टीवर येऊन थडकणाऱ्या वादळांच्या वेळी आलेला आहे. ओरिसाच्या किनारपट्टीवर २९ ऑक्टोबर १९९९ रोजी ताशी २६० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाच्या वाऱ्याचे वादळ आले होते. या वादळाचा तडाखा ओरिसाच्या १० जिल्ह्यांना बसला होता. जिथे तिवरांची वाढ झाली होती, तिथे हा वेग बऱ्यापैकी रोखला गेला.

महाराष्ट्रात आहेत १८ प्रजाती
भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्यापूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे. या ठिकाणी माेठ्या प्रमाणात खारफुटीची आतापर्यंत नाेंद झालेली आहे. जगामध्ये खारफुटी वनस्पतीच्या एकूण ७३ जाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये ४६ जाती आहेत. पश्चिम किनार पट्टीवर २७, तर पूर्व किनार पट्टीवर ४० जाती आहेत अंदमान आणि निकोबार या बेटावर ३८ जाती आहेत. महाराष्ट्रात ६५ ते ७० खाड्यांच्या प्रदेशात खारफुटी आहे. राज्यात १८ प्रजाती असून झायलोकार्पस, सायनोमेट्रा व हेरीटेरीया या तीन दुर्मीळ प्रजाती आहेत.